उस्मानाबाद -गतीमंद मुलांना रंग खेळण्याचा आनंद मिळावा व या मुलांच्या चेहऱ्यावर हास्य आणण्यासाठी कळंब येथील स्वा. गणपतराव कथले युवक आघाडीच्या युवकांनी शहरातील संत ज्ञानेश्वर व सोजर मतिमंद विद्यालय येथील गतीमंद मुलांसोबत धुलीवंदन साजरे करून या मुलांच्या आयुष्यात रंग भरण्याचा प्रयत्न केला आहे.
गतिमंद मुलांसोबत तरुणांनी खेळला रंग - कळंब
कळंब येथील स्वा. गणपतराव कथले युवक आघाडीच्या युवकांनी शहरातील संत ज्ञानेश्वर व सोजर मतिमंद विद्यालय येथील गतीमंद मुलांसोबत धुलीवंदन साजरे करून या मुलांच्या आयुष्यात रंग भरण्याचा प्रयत्न केला आहे.
स्वा. गणपतराव कथले युवक आघाडीच्या युवकांनी शहरातील गतीमंद मुलांसोबत धुलीवंदन साजरे केले.
अशी अनेक गतिमंद मुलांना धुलीवंदनाविषयी माहिती नसते. अशा मुलांच्या आयुष्यात काही काळ रंग भरण्याचा प्रयत्न कळंब येथील यूवकानी केला आहे. विविध सामाजिक कार्यासोबत या युवकांनी मागील चार वर्षांपासून हा अभिनव उपक्रम राबवला आहे. बाळासाहेब कथले, सुमित बलदोटा, गोविंद खंडेलवाल, अशोक फल्ले, यश सुराणा, दीपक साखरे, प्रकाश खामकर यांनी हा उपक्रम राबविला आहे.