महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धक्कादायक! चोरीचा आळ येण्याच्या भीतीने तरुणीची वसतिगृहात आत्महत्या

सोबत राहत असलेल्या एका मैत्रिणीला घरून खर्चासाठी मिळालेले पैसे चोरीला गेल्याचा प्रकार मंगळवार (दि. १०) उघडकीस आला होता. मंगळवारी रात्री क्षितजा तणावाखाली आली. आज (11 डिसेंबर) सकाळी उठल्यानंतर सकाळी ७ च्या सुमारास क्षितीजाच्या मैत्रिणी आणि महिला आजुबाजूला नसल्याचे पाहून तिने राहत्या खोलीत आत्महत्या केली

chori
चोरीचा आळ येण्याच्या भीतीने तरुणीची वसतिगृहात आत्महत्या

By

Published : Dec 11, 2019, 8:25 PM IST

उस्मानाबाद - वाशी शहरातील कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीने वसतिगृहात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. क्षितीजा शंकर शिंदे (रा. बावी), असे मृत मुलीचे नाव आहे. ती इयत्ता अकरावीत विज्ञान शाखेचे शिक्षण घेत होती. आपल्यावर चोरीचा आळ येईल या भीतीने क्षितीजाने आत्महत्या केल्यची प्रथमिक माहिती समोर आली आहे.

चोरीचा आळ येण्याच्या भितीने तरुणीची वसतिगृहात आत्महत्या

क्षितीजा महाविद्यालयाच्या मुलींच्या वसतिगृहामध्ये ४ क्रमांकाच्या खोलीत आपल्या अन्य मैत्रिणींसह वास्तव्यास होती. तिच्यासोबत खोलीमध्ये राहत असलेल्या एका मैत्रिणीला घरून खर्चासाठी मिळालेले पैसे चोरीला गेल्याचा प्रकार मंगळवार (दि. १०) उघडकीस आला होता. याची तक्रार मुलीने वसतिगृह व्यवस्थापनाकडे केली होती. घडलेल्या प्रकाराबद्दल महाविद्यालयाच्या प्राचार्या शारदा मोळवणे यांनी सर्व मुलींना बोलावून घेत सर्वांना समज दिली होती. त्यानंतर, मंगळवारी रात्री क्षितजा तणावाखाली आली. आज(11 डिसेंबर) सकाळी उठल्यानंतर सकाळी ७ च्यासुमारास क्षितीजाच्या मैत्रिणी आणि महिला आजुबाजूला नसल्याचे पाहून तिने राहत्या खोलीत आत्महत्या केली.

हेही वाचा -राधानगरीतील तरुणीच्या मृत्यूचे गूढ उकलेले, आत्महत्या नैराश्येतूनच

घटनेची माहिती मिळताच वाशी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांनी घटनास्थळी धाव घेतली. नातेवाईकांसमक्ष पंचनामा करून शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

ABOUT THE AUTHOR

...view details