उस्मानाबाद :भूम तालुक्यातील पाथरूड परिसरात शुक्रवारी दुपारी धो-धो पाऊस पडला. या पावसामुळे दुधना नदीवरील (Dudhana River Flood Osmanabad) पूल पाण्याखाली गेला होता. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. असं असतानाही एका तरुणाने पूराच्या पाण्यातून दुचाकीवर बसून जाण्याचा प्रयत्न केला; मात्र पाण्याच्या अतिवेगामुळे तरुण दुचाकीसह नदीपात्रात (young man fell into flood of Dudhana river) कोसळला. या दरम्यान पुलाचा कठडा हाती आल्याने तरुण बचावला (young man rescued from Dudhana River Flood); परंतु, त्या तरुणाची दुचाकी वाहून गेली.
young man rescued from River Flood : दुधना नदीच्या पुरात वाहून जाणारा तरुण कठडा हाती आल्याने बचावला - young man rescued from River Flood
दुधना नदीच्या पुलावरील वाहतूक ठप्प झाली होती. असं असतानाही एका तरुणाने पूराच्या पाण्यातून दुचाकीवर बसून जाण्याचा प्रयत्न केला; मात्र पाण्याच्या अतिवेगामुळे तरुण दुचाकीसह नदीपात्रात (young man fell into flood of Dudhana river) कोसळला. या दरम्यान पुलाचा कठडा हाती आल्याने तरुण बचावला (young man rescued from Dudhana River Flood); परंतु, त्या तरुणाची दुचाकी वाहून गेली.
दुचाकी गेली, जीव तेवढा वाचला-दुधोडी येथील कांतीलाल महानवर याने पुराच्या पाण्यातून दुचाकी घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. अर्धाअधिक पूलही त्याने पारही केला. मात्र नदीच्या मुख्य प्रवाहाच्या पाण्याचा वेग अधिक असल्यामुळे दुचाकीसह तरुणही नदीपात्रात कोसळला. सुदैवाने तरुणाच्या हाती पुलाचा कठडा आल्याने तो वाचला मात्र दुचाकी पुराच्या पाण्यात वाहून गेली. तरुणाने शोध पथकाच्या मदतीने रात्री उशिरापर्यंत दुचाकीचा शोधही घेतला. परंतु दुचाकी सापडली नाही. तर नशीब बलवत्तर म्हणून तरुण सुदैवाने वाचला.