उस्मानाबाद - जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील पांगरी येथे रानडुकराने शेतकऱ्यावर हल्ला केल्याची शुक्रवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास घटना घडली आहे. यामध्ये शेतकरी गंभीर जखमी झाला असून पंढरी सरवदे (४२), असे शेतकऱ्याचे नाव आहे.
उस्मानाबादेत रानडुकराच्या हल्ल्यात शेतकरी जखमी - उस्मानाबाद लेटेस्ट न्युज
यमगरवाडी येथील शेतकरी पंढरी सरवदे हे दुपारी शेतात काम करत होते. त्यावेळी रानडुक्कर अचानक समोरून आला आणि काही समजण्याच्या आत त्यांच्यावर हल्ला चढवला. यामध्ये सरवदे यांच्या हाताला गंभीर जखम झाली असून बोटांना रक्तपुरवठा करणाऱ्या नसा पूर्णपणे तुटल्याचे सांगितले जात आहे.
उस्मानाबादेत रानडुकराच्या हल्ल्यात शेतकरी जखमी
यमगरवाडी येथील शेतकरी पंढरी सरवदे हे दुपारी शेतात काम करत होते. त्यावेळी रानडुक्कर अचानक समोरून आला आणि काही समजण्याच्या आत त्यांच्यावर हल्ला चढवला. यामध्ये सरवदे यांच्या हाताला गंभीर जखम झाली असून बोटांना रक्तपुरवठा करणाऱ्या नसा पूर्णपणे तुटल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्यावर उस्मानाबाद खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.