उस्मानाबाद -तालुक्यातील ढोकी पोलिस ठाण्यात भलताच थरार पाहायला मिळाला आहे. एका पतीने पोलिस ठाण्यात येऊन धिंगाणा घातला. त्याने 'माझ्या पत्नीची तक्रार का घेता?' असे म्हणत पोलीस ठाण्यातच अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. प्रताप लिंबाजी कांबळे असे (वय 28) असे या व्यक्तीचे नाव आहे. ही घटना बुधवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ढोकी पोलीस ठाण्याच्या प्रांगणात घडली.
'माझ्या पत्नीची तक्रार का घेता?' म्हणत पतीचा पोलीस ठाण्यात आत्महत्येचा प्रयत्न - पोलीस अधीक्षक कार्यालय
माझ्या पत्नीची तक्रार का घेता? असे म्हणत एका पतीने पोलीस ठाण्याच्या प्रांगणात अंगावर पेट्रोल टाकत आत्महत्येचा प्रयत्न केला. या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक कार्यालय, उस्मानाबाद
आरोपी प्रताप लिंबाजी कांबळे हा बुधवारी 16 सप्टेंबरला दीड वाजण्याच्या सुमारास ढोकी पोलीस ठाण्याच्या प्रांगणात आला. यावेळी त्याने आरडाओरडा करत 'माझ्या पत्नीची तक्रार का घेता?' असे म्हणून स्वत:च्या अंगावर पेट्रोल ओतुन घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी, पोलीस हेड कॉन्स्टेबल बिभीषण सोनवणे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन आरोपी प्रताप कांबळे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास ढोकी पोलीस करीत आहेत.