महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुख्यमंत्र्यांसमोर धाय मोकलून रडत रडत शेतकऱ्याने घेतला सेल्फी - शेतकरी अरविंद माळी सेल्फी

अरविंद माळी यांनी मुख्यमंत्र्यांसमोर टाहो फोडला. रडत असतानाही अरविंद माळी यांना मुख्यमंत्र्यांसोबतचा सेल्फीचा मोह आवरता आला नाही. माळी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पालकमंत्री शंकर गडाख यांच्यासोबत रडत-रडत सेल्फी घेतला.

selfie with cm
मुख्यमंत्र्यांसमोर धाय मोकलून रडत रडत शेतकऱ्याने घेतला सेल्फी

By

Published : Oct 21, 2020, 8:21 PM IST

उस्मानाबाद -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जिल्हा दौर्‍यावर होते. त्यांनी परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली व शेतकऱ्यांना आधार देण्याचा प्रयत्न केला. यावेळी शेतकरी अरविंद माळी हे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा पाडा मुख्यमंत्र्यांसमोर वाचत होते. त्यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले. 'साहेब आमचा सगळा संसार उघड्यावर आला हो' म्हणत अरविंद माळी यांनी मुख्यमंत्र्यांसमोर टाहो फोडला. रडत असतानाही अरविंद माळी यांना मुख्यमंत्र्यांसोबतचा सेल्फीचा मोह आवरता आला नाही. माळी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पालकमंत्री शंकर गडाख यांच्यासोबत रडत-रडत सेल्फी घेतला.

मुख्यमंत्र्यांसमोर धाय मोकलून रडत रडत शेतकऱ्याने घेतला सेल्फी

हेही वाचा -'खडसेंचे सच्चा राष्ट्रवादी पक्षातून राष्ट्रवादीपणाचा बुरखा पांघरणाऱ्या पक्षात जाणे, हे न पटण्यासारखे'

यावेळी रडत असलेल्या अरविंद माळी यांना मुख्यमंत्र्यांनी समजावून सांगत, काळजी करू नका मी तुमच्यासोबत आहे, तुम्हाला योग्य ती मदत मी नक्की करेल, असे म्हणत या शेतकऱ्यांना आधार देण्याचा प्रयत्न केला. मागील दोन दिवस सतत पडणाऱ्या परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सोयाबीन द्राक्षांच्या बागासह शेतकऱ्यांच्या घरांची पडझड झाली आहे. त्या अनुषंगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्ह्यातील काटगाव, आपसिंगा, कात्री या गावांना भेटी देत शेतकऱ्यांना आधार दिला.

ABOUT THE AUTHOR

...view details