उस्मानाबाद - आज सकाळी सोलापूरचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी सोलापूर शहरात सायकलवर फिरून पर्यावरणासंदर्भात जनजागृती करण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांच्यासोबत त्याच्या गाडीचा ताफाही होता. त्यानंतर सुभाष देशमुख हे सोलापूरहून उस्मानाबाद येथे आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
सोलापूरमध्ये असेन तेव्हा सायकलवरच फिरणार - सहकारमंत्री देशमुख - व्यक्ती
सायकल चालवण्यासाठी जनजागृती झाली पाहिजे. सर्वांनी गाड्यांचा वापर कमी करावा व सायकलवर जास्त प्रमाणात फिरण्याचा प्रयत्न करावा. सायकलवरून फिरल्यामुळे शरीर चांगले राहते. आपले आरोग्य सुदृढ होते यासोबतच इंधनाचीही बचत होते, असेही त्यांनी सांगितले.

सोलापूर येथे शहरात काढलेल्या सायकल फेरीविषयी देशमुख यांनी सांगितले की, मी ज्या ज्यावेळी सोलापूरमध्ये असेन त्या त्यावेळी शहरात फिरताना सायकलचाच वापर करणार आहे. वाहनामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. त्यामुळे सायकल चालवण्यासाठी जनजागृती झाली पाहिजे. सर्वांनी गाड्यांचा वापर कमी करावा व सायकलवर जास्त प्रमाणात फिरण्याचा प्रयत्न करावा. सायकलवरून फिरल्यामुळे शरीर चांगले राहते. आपले आरोग्य सुदृढ होते यासोबतच इंधनाचीही बचत होते, असेही त्यांनी सांगितले.
उद्या सोलापूर सोशल फाउंडेशनच्या वतीने पंढरपूर शहरात सायकल चालवण्याचा उपक्रम राबवण्यात येणार आहे. यासाठी 50 सायकली घेऊन विविध क्षेत्रातील व्यक्ती आपल्या घरापासून सायकल चालवायला सुरुवात करणार आहेत. यातून ते 'पर्यावरण बचाव' असा संदेश या माध्यमातून देण्यात येणार असल्याची माहिती, सुभाष देशमुख यांनी उस्मानाबाद येथे दिली.