महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गेल्या दशकभरात वाचन संस्कृतीत काय बदल घडलीत? ऐका प्रकाशकांच्या तोंडून

कोणत्याही गोष्टीचा अतिरेक झाला की त्याचा शेवट होतोच. त्याचप्रमाणे सोशल मीडियाचा वापर नियंत्रणात येईल आणि पुन्हा वाचन संस्कृतीला गतवैभव मिळेल, असा आशावाद साहित्य संमेलनातील प्रकाशकांना आहे.

osmanabad
माहिती घेताना 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधी

By

Published : Jan 12, 2020, 9:34 PM IST

उस्मानाबाद- काळाच्या ओघात वाचन संस्कृतीमध्ये आमूलाग्र बदल झाला आहे. वाचनाची आवड कायम असली तरी माध्यमे बदलत आहेत. सोशल मीडिया ज्या प्रमाणात वाढत आहे त्याचा अतिरेक होऊन पुन्हा तरुण देखील पुस्तकाची पाने चाळताना दिसतील, असा विश्वास साहित्य संमेलनात सहभागी झालेल्या प्रकाशकांनी व्यक्त केला आहे. तसे बदल पाश्चिमात्य देशात पाहवयासही मिळत आहे.

गेल्या दशकभरात वाचक संस्कृतीमध्ये काय बदल झालेत याबाबत साहित्य संमेलनातील प्रकाशकांकडून माहिती घेताना 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधी

दहा वर्षांपूर्वीची स्थिती ही वेगळी होती. प्रकाशकांना लेखकांकडून पुस्तके मिळविण्याबाबत चिंता असायची. लेखकाला मानधन देऊन त्यांची पुस्तके प्रकाशन संस्थेमध्ये ठेवली जात होती. आणि संमेलनाच्याच ठिकाणी लेखक उपस्थित राहून पुस्तक खरेदी कारणाऱ्यांना पुस्तकावर स्वाक्षरी देत असत. त्यामुळे, वाचकांचा उत्साह वाढत होता. शिवाय, प्रकाशकांनाही अधिकची विक्री होत असल्याने त्याचा फायदा होत होता.

सध्या स्थिती बदलली आहे. लेखक पाहिजे त्याप्रमाणात प्रकाशनाच्या ठिकाणी उपस्थित राहत नाहीत. आणि प्रकाशकांकडे विना मानधन पुस्तके आणून दिली जातात. त्यामुळे आजही १० वर्षांपूर्वी प्रस्थापित असलेल्या लेखकांच्याच पुस्तकाची मागणी होत आहे. सध्या सोशल मीडियाचा अतिरेक झाला आहे. आणि कोणत्याही गोष्टीचा अतिरेक झाला की त्याचा शेवट होतोच. त्याप्रमाणे सोशल मीडियाचा वापर नियंत्रणात येईल आणि पुन्हा वाचन संस्कृतीला गतवैभव मिळेल, असा आशावाद प्रकाशकांना आहे. संमेलनात वाचकांचा अभुतपूर्व प्रतिसाद मिळत असल्याचेही प्रकाशकांनी सांगितले.

हेही वाचा-डिग्री 'खुरपं' अन् कविता सहाशे, बायकोसोबतच्या भांडणातूनही कविता करणारा कवी!

ABOUT THE AUTHOR

...view details