उस्मानाबाद- शहराला गेल्या 2 महिन्यांपासून 15 ते 20 दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणासह आणखी 4 पाणीपुरवठा योजनातून शहराला पाणीपुरवठा होतो. मात्र, सध्या उजनी पाणी पुरवठ्याव्यतिरिक्त इतर धारणे कोरडी पडली आहेत. त्यामुळे नागरिकांना पैसे खर्च करुन पाणी विकत घ्यावे लागत आहे. सध्या शहरात टँकरच्या माध्यमातून दररोज लाखो रुपयांचे पाणी नागरिक विकत घेत आहेत.
उस्मानाबादमध्ये 15 ते 20 दिवसाआड पाणीपुरवठा, नागरिकांवर पाणी विकत घेण्याची वेळ - विकत पाणी
शहराला गेल्या 2 महिन्यांपासून 15 ते 20 दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे.
नगरपालिकेने गेल्या 3 ते 4 वर्षांपूर्वी उजनी पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून शहराला पाणी उपलब्ध करण्यासाठी व्यवस्था केली होती. मात्र, ही योजना सध्या तरी कुचकामी ठरल्याचे दिसून येत आहे. याबरोबरच रुईभर पाणीपुरवठा योजना, तेरणा पाणी पुरवठा योजना व शेकापूर तलाव पाणी पुरवठा योजना या 3 योजना प्रकल्प कोरडे पडल्यामुळे ठप्प झाल्या आहेत. त्यामुळे शहरातील नागरिकांना विकतच्या पाण्यावरच अवलंबून राहावे लागत आहे.
उजनी धरणातून 16 MLT पाण्याची पाईपलाईन केली आहे. मात्र, यातून आता फक्त 8 MLT पाणी येत आहे. तर शहरापर्यंत फक्त 5 MLT एवढेच पाणी पोहचत आहे. त्यामुळे शहरामध्ये 15 ते 20 दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिक 500 लिटर छोटया टँकरसाठी 150 रुपये मोजून पाणी विकत घेत आहेत.