उस्मानाबाद -जिल्हा टँकरमुक्त होईल का नाही, असा प्रश्न सर्व जिल्हावासियांना पडला आहे. कारण महसूल विभागाच्या अहवालानुसार आजही जिल्ह्यातील 157 गावांमध्ये जवळपास 221 टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.
पावसाळा सुरू होऊन दोन महिने झाले तरीही अद्यापही दमदार पाऊस झालेला नाही. जिल्ह्यातील लहान-मोठी सर्व धरणे कोरडीठाक पडली आहेत. या 221 टँकरच्या माध्यमातून 4,17,338 एवढ्या लोकांची तहान भागत आहे. त्याचबरोबर विंधन विहिरींचे अधिग्रहण केलेली संख्याही अधिक आहे. जिल्ह्यात जवळपास 1,063 एवढ्या विंधन विहिरींचे अधिग्रहण करण्यात आलेले आहे.