महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

COVID19: उस्मानाबादमधील वाघोलीत गावबंदी, काटाड्या टाकून रस्ते बंद - उस्मानाबाद कोरोना व्हायरस बातमी

वाघोली गावातील ग्रामस्थांनी कोरोनाची चांगलीच धास्ती घेतली आहे. गावात इतरांना प्रवेश बंद केला आहे. गावात येणारे सर्व रस्ते काटाड्या टाकून बंद करण्यात आले आहे. त्यामुळे गावात बाहेरुन येणाऱ्यास सक्त मनाई आहे.

wagholi-village-blockade-in-osmanabad-due-to-corona-virus
उस्मानाबादमधील वाघोलीत गावबंदी...

By

Published : Mar 25, 2020, 11:30 AM IST

उस्मानाबाद-जगभर थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरचा राज्यात झपाट्याने विळखा वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात संचारबंदी लावण्यात आली आहे. नागरिकांमध्ये कोरोनामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील वाघोली गावातील नागरिकांनी शहरात प्रवेश करणारा रस्ता काटाड्या टाकून बंद केला आहे.

उस्मानाबादमधील वाघोलीत गावबंदी...

हेही वाचा-''गावाकडच्या लोकांनी कायदा हातात घेऊ नये, पोलिसांना त्यांचे काम करू द्या''

वाघोली गावातील ग्रामस्थांनी कोरोनाची चांगलीच धास्ती घेतली आहे. गावात इतरांना प्रवेश बंद केला आहे. गावात येणारे सर्व रस्ते काटाड्या टाकून बंद करण्यात आले आहे. त्यामुळे गावात बाहेरुन येणाऱ्यास सक्त मनाई आहे. मात्र, संचार बंदी असतानाही गावात नागरिक घराबाहेर पडत आहेत. प्रशासनाने आवाहन करुनही नागरिक घरात बसताना दिसत नाहीत. त्यामुळे नागरिकांना कोरोनाचे गांभीर्य अजून लक्षात आल्याचे दिसत नाही.

दरम्यान, देशातील कोरोना रुग्णांची संख्या 562 वर पोहोचली आहे. महाराष्ट्रात मंगळवारी आणखी एका रुग्णाच्या मृत्युमुळे देशातील करोनाबळींची संख्या 09 वर गेली. देशातील 32 राज्यांसह केंद्रशासित प्रदेशांनी 31 मार्चपर्यंत संपूर्ण टाळेबंदी जाहीर केली आहे. मात्र, टाळेबंदी झुगारुन लोक रस्त्यावर गर्दी करत असल्याने आवश्यकता भासल्यास संचारबंदी लागू करण्याचे निर्देश केंद्राने दिले होते. अखेर केंद्राने 21 दिवसांची देशव्यापी टाळेबंदी जाहीर केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details