उस्मानाबाद - जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील सौंदाणा आणि वाकडी या गावातील १ हजार ७४० मतदारांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे. दुपारी ३ वाजेपर्यंत या दोन्ही गावातील एकाही मतदारांनी मतदान केले नाही. गावाला जोडणारा प्रमुख रस्ता दुरुस्त करण्याची मागणी हे ग्रामस्थ करीत आहेत.
उस्मानाबाद मतदारसंघ : कळंबमधल्या २ गावांतील ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार - bycott election
गेल्या अनेक दिवसांपासून या दोन्ही गावातील गावकरी प्रशासनाकडे रस्ता दुरुस्त करण्याची मागणी करत होते. मात्र, या मागणीकडे वारंवार दुर्लक्ष करण्यात आले. मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशाराही दिला होता. मात्र, प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहिले नाही. त्यामुळे या दोन्ही गावातील गावकऱ्यांनी अखेर मतदानावर बहिष्कार टाकला.
गेल्या अनेक दिवसांपासून या दोन्ही गावातील गावकरी प्रशासनाकडे रस्ता दुरुस्त करण्याची मागणी करत होते. मात्र, या मागणीकडे वारंवार दुर्लक्ष करण्यात आले. त्याचबरोबर रस्ता झाला नाही, तर मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशाराही दिला होता. मात्र, प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहिले नाही. त्यामुळे या दोन्ही गावातील गावकऱ्यांनी अखेर मतदानावर बहिष्कार टाकला.
सौंदाणा या गावचे १ हजार २४२ मतदार आहेत, तर वाकडी या गावचे ४९८ मतदार आहेत. या दोन्ही गावात मिळून एकूण १ हजार ७४० मतदार आहेत