महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गौरी-गणपतीच्या सणानिमित्त भाज्यांचे दर गगनाला भिडले

गौरी-गणपती हे सणाचे दिवस असल्याने भाजीपाल्यांचे भाव गगनाला भिडले असल्याचे चित्र ठिक-ठिकाणी पाहायला मिळत आहे. असेच काहीसे चित्र उस्मानाबाद जिल्ह्यातील भाजीपाल्यांच्या दुकानात दिसून आले.

भाज्यांचे दर गगनाला

By

Published : Sep 5, 2019, 11:47 PM IST

उस्मानाबद - गौरी-गणपती हे सणाचे दिवस असल्याने भाजीपाल्यांचे भाव गगनाला भिडले असल्याचे चित्र ठिक-ठिकाणी पाहायला मिळत आहे. असेच काहीसे चित्र उस्मानाबाद जिल्ह्यातील भाजीपाल्यांच्या दुकानात दिसून आले.

गौरी-गणपती सणानिमीत्त भाज्यांचे दरात वाढ
गौरी-गणपती सणानिमित्त घरोघरी १६ प्रकारच्या भाज्या केल्या जातात. त्यामुळे प्रत्येक जण बाजारात भाजी खरेदी करण्यासाठी येतो. वाढलेली लोकांची गर्दी आणि भाज्यांची कमी झालेली आवक, यामुळे भाज्यांचे दर सर्वसामान्यांच्या खिशाला न परवडणारे आहेत. गौरी-गणपतीच्या सणानिमित्त या दिवशी केळीची पाने व फुलांची विक्री देखील केली जाते. पाऊस कमी असल्याने तसेच बाजारात भाज्यांची संख्या कमी असल्याने भाज्यांचे भाव वाढले आहेत. शिमला मिरची, कारली, काशी भोपळा, तसेच सर्व प्रकारच्या पालेभाज्यांची खरेदी या महालक्ष्मीच्या सणानिमित्त केली जाते.

हेही वाचा -गौरी गणपती पूजनाचा सोहळा; उत्सवासाठी १०० विविध प्रकारचे नैवेद्य बनवून आज गौरीला दाखवतात


गौरी-गणपती सणानिमित्त घरोघरी सोळा प्रकारच्या भाज्या बनवल्या जातात. त्यामुळे सध्या या सर्वच भाज्यांचे भाव वाढले असून साधारणत: सर्वच भाज्या ह्या 50 रुपये प्रति किलो दराप्रमाणे विकल्या जात आहेत.

भाज्या आणि त्यांचे दर -

1) काशी भोपळा - 80 रुपये किलो, 2) शिमला मिरची - 40 रुपये किलो, 3)भेंडी - 50 रुपये किलो, 4) गवार - 50 रुपये किलो, 5) मेथी - 20 रुपये 1 पिंडी, 6) टोमॅटो - 30 रुपये किलो, 7) पालक - 10 रुपये एक पिंडी, 8) पत्ता कोबी - 60 रुपये किलो

ABOUT THE AUTHOR

...view details