उस्मानाबाद - वंचित बहुजन आघाडीचा जाहीरनामा हा काँग्रेसने विधानसभा निवडणुकीसाठी कॉपी केला आहे, असा आरोप वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी येथे केला. तसेच काँग्रेस चोर तर भाजप हे डाकू असल्याची टीकाही त्यांनी केली. वंचित बहुजन आघाडीची रविवारी तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा येथे सभा घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी काँग्रेस आणि भाजपवर सडकून टीका केली.
काँग्रेस 'चोर' तर भाजप 'डाकू' - प्रकाश आंबेडकर हेही वाचा -'कलम 370 निवडणुकीचा मुद्दा का असू शकत नाही?'
पुढे बोलताना ते म्हणाले, यानंतर तर पुन्हा भाजपची सत्ता आली तर आणखी सहा बँका बंद पडतील. तसेच खोपोली परिसरातील टाटा धरणातील पाणी विजेसाठी न वापरता 5 टीएमसी पाणी उजनीत आणता आले असते. मराठवाडा दुष्काळ मुक्त करता आला असता. मात्र, सरकारमध्ये नियोजनाचा अभाव दिसतो. धरण टाटाची जरी असले तरी पाणी कोणाच्या मालकीचे नसते. सरकारला पाणी कोठेही वापरता येते.
हेही वाचा -'कलम 370 निवडणुकीचा मुद्दा का असू शकत नाही?'
यासाठी निर्णय घेण्याची ताकत महत्त्वाची आहे. म्हणून आम्हाला सत्ता द्या, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी तुळजापूर विधानसभेचे उमेदवार अशोक जगदाळे, उमरगा लोहाराचे उमेदवार रमाकांत गायकवाड आणि उमेदवार चंद्रशेखर गायकवाड यांच्यासह अर्जुन सलगर यांच्यासह समर्थक उपस्थित होते.