उस्मानाबाद - जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने ईव्हीएम मशीनच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. ईव्हीएम मशीन बंद करून बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतली होती. यामुळे जिल्हा मनसेच्या वतीने आज (दि.२९ जुलै) ला प्रतिकात्मक ईव्हीएम मशीन जाळून विरोध दर्शवण्यात आला.
उस्मानाबाद : मनसेने जाळली प्रतिकात्मक ईव्हीएम मशीन - जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटील
जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने ईव्हीएम मशीनच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रतिकात्मक ईव्हीएम मशीन जाळून विरोध दर्शवण्यात आला.
जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने ईव्हीएम मशीनच्या विरोधात आंदोलन करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मनसे जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी हे आंदोलन केले. यावेळी कागदावरती ईव्हीएम मशीनचे प्रतिकात्मक रूप बनवून ते पेटवण्यात आले.
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन ईव्हीएम हटवून बॅलेट पेपर वर मतदान घेण्याची मागणी करण्यात आली. तसेच ईव्हीएम मशीनबाबत जनतेमध्ये संशय निर्माण झाला असून, त्यामुळे निवडणूक लोकशाही पद्धतीने होत नसल्याचा आरोपही मनसेच्या वतीने करण्यात आला.