उस्मानाबाद - 93 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आज पार पडले. या संमेलनासाठी उस्मानाबादकरांनी प्रचंड मेहनत घेतली. संयोजन समितीपासून ते जिल्हा परिषदेत शाळेतील विद्यार्थ्यांनी या संमेलनात आपला हातभार लावला. संमेलनाच्या पाठीमागे राबणारे हात शाळेतील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी गेल्या पंधरा दिवसांपासून या संमेलनाच्या तयारीला लागले होते.
साहित्य संमेलनाच्या मागे राबणारे हात...
93 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आज पार पडले. या संमेलनासाठी उस्मानाबादकरांनी प्रचंड मेहनत घेतली. संयोजन समितीपासून ते जिल्हा परिषदेत शाळेतील विद्यार्थ्यांनी या संमेलनात आपला हातभार लावला.
शहरातील चौकाचौकातील स्वच्छता करणे, रांगोळी काढणे अशा विविध प्रकारची कामे शाळा-महाविद्यालयातील तरुण-तरुणी करत होते. त्यांचा अनुभव काय होता? हा आमच्या प्रतिनीधींनी आढाव घेतला आहे. मुले म्हणाली, 'आम्हाला यातून खूप काही शिकायला मिळालं, यापूर्वी अशा मोठ्या महोत्सवामध्ये सहभाग घेता आला नव्हता मात्र या साहित्य संमेलनामुळे आम्हाला ही संधी मिळाली.' अशा भावना मुलांनी व्यक्त केल्या आहेत.
हेही वाचा - महाराष्ट्र केसरी हर्षवर्धनचे १०३ किलो लाडू तुलाने नाशिकमध्ये स्वागत, ढोल-ताशांचा दणदणाट