महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अज्ञाताने सोयाबीनची गंजी पेटवली; उस्मानाबादेत शेतकर्‍यांचे लाखोंचे नुकसान - Osmanabad soybean story

निकृष्ट बियाणांमुळे पाटील यांनी दुबार पेरणी केली होती. त्यातच अतिृष्टीमुळे सोयबीन पिकाचे नुकसान झाले. उरलेले सोयाबीन शिवाजी पाटील यांनी काढून गंजी करून ठेवले होते. मात्र, तेवढे सोयाबीनही मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञाताने पेटवून दिले.

soyabean
सोयाबीनची गंजी पेटवली

By

Published : Oct 30, 2020, 7:17 PM IST

उस्मानाबाद- जिल्ह्यातील शेतकरी शिवाजी धोंडिबा पाटील यांचे अडीच एकर शेतातील सोयबीन अज्ञाताने पेटवून दिले आहे. त्यामुळे या शेतकऱ्याला लाखो रुपयांचा फटका बसला आहे. ही घटना खेड शिवारात घडली. शिवाजी पाटील यांनी अडीच एकरात दुबार पेरणी करून हे सोयाबीन पिकवले होते.

निकृष्ट बियाणांमुळे पाटील यांनी दुबार पेरणी केली होती. त्यातच अतिृष्टीमुळे सोयबीन पिकाचे नुकसान झाले. उरलेले सोयाबीन शिवाजी पाटील यांनी काढून गंजी करून ठेवले होते. मात्र, तेवढे सोयाबीनही मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञाताने पेटवून दिले.

निकृष्ट बियाणे, दुष्काळ आणि नंतर आलेला तुफान पाऊस यातून कसेबसे वाचावलेले सोयाबीन पेटल्याने शिवाजी पाटील यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सोयाबीन मळणी यंत्र मिळत नसल्याने पाटील यांनी सोयाबीनची गंजी करून ठेवली होती. जवळपास 30 क्विंटल सोयाबीनमधून त्यांना दीड लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले असते. याप्रकरणी तलाठी यांनी पंचनामा केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details