महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

डिग्री 'खुरपं' अन् कविता सहाशे, बायकोसोबतच्या भांडणातूनही कविता करणारा कवी! - 93 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

उस्मानाबाद येथे सुरू असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात विविध भागांतून साहित्यिक सहभागी झाले आहेत. यामध्ये दुसरी शिक्षण झालेल्या आणि बायकोसोबतच्या भांडणातूनही कविता सूचणाऱ्या कवींचा समावेश आहे.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

By

Published : Jan 12, 2020, 1:23 PM IST

Updated : Jan 12, 2020, 9:10 PM IST

उस्मानाबाद -93वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबाद येथे सुरू आहे. साहित्य संमेलनाचा आज (रविवार) तिसरा दिवस आहे. या संमेलनात विविध भागांतून आलेल्या मराठी साहित्यिकांनी सहभागी होत आहेत. यामध्ये दुसरी शिक्षण झालेल्या आणि बायकोसोबतच्या भांडणातूनही कविता सूचणाऱ्या कवींचा समावेश आहे.

डिग्री 'खुरपं' अन् कविता सहाशे, बायकोसोबतच्या भांडणातूनही कविता करणारा कवी!


सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथील चौसष्ट वर्षीय विमल माळी यांचे शिक्षण फक्त दुसऱ्या इयत्तेपर्यंत झालेले आहे. असे असतानाही त्यांनी आत्तापर्यंत ६०० कविता लिहिल्या आहेत. विमलबाई यांनी आपल्या जीवनावर आधारित कविता केल्या आहेत. त्यांना पश्चिम महाराष्ट्रात बहिणाबाई म्हणून ओळखले जाते.

हेही वाचा - साहित्याची भूक भागवण्यासाठी पायी, सायकलसह विमानाने केला 'या' व्यक्तीने प्रवास

भारत घाटशिळे यांची गोष्टच वेगळी आहे. आपली दैनंदिन कामे करताना त्यांना कविता सूचतात. यामधूनच त्यांनी शेकडो कविता लिहल्या आहेत. बायकोबरोबर भांडणं झाली तरी, त्या भांडणातून ते कविता तयार करतात. अशा प्रकारचे कवी संमेलनाच्या परिसरात पहायला मिळत आहेत. साहित्य रसिक या कवींकडून कविता ऐकून आपले मनोरंजन करून घेत आहेत.

Last Updated : Jan 12, 2020, 9:10 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details