उस्मानाबाद - विधानसभेच्या प्रचारासाठी आज (सोमवार) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उस्मानाबाद शहरात सभा घेत आहेत. उस्मानाबाद-कळंब मतदारसंघाचे उमेदवार कैलास पाटील शिवसेनेकडून रिंगणात आहेत. तर, राष्ट्रवादीकडून संजय निंबाळकर हे निवडणूक लढवत आहेत. दोन्ही उमेदवार या विधानसभेसाठी नवखे आहेत.
प्रतिनिधी कैलास चौधरी यांनी घेतलेला आढावा हेही वाचा - सिलेंडरच्या स्फोटात 7 ठार, तर 15 जण जखमी
शिवसेनेतील अंतर्गत वादामुळे व उपजिल्हाप्रमुखांनी केलेल्या बंडामुळे तसेच भाजपच्या असहकार्याच्या भूमिकेमुळे शिवसेनेला येथे जिवाचे रान करून प्रचार करावा लागत आहे. जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या प्रचार सभा झाल्या आहेत. यामध्ये अमित शाह, सुप्रिया सुळे, प्रकाश आंबेडकर, बाळासाहेब थोरात अशा विविधा पक्षांच्या नेत्यांच्या प्रचारसभा झाल्या असून सर्वांच्याच नजरा उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघवर लागल्या आहेत. याच अनुषंगाने उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होत आहे.
हेही वाचा - मोदींनी ५ वर्षांत जे देशाचे नुकसान केले, ते काँग्रेसने कधीच केले नाही - राहुल गांधी