उस्मानाबाद - शहरात दोन ठिकाणी दरोडेखोरांनी मारहाण करत लाखोंचा दरोडा घातल्याची घटना घडली ( Two Robbery in Osmanabad city) आहे. सोमवारी पहाटे कर्मवीरनगर, पोस्ट कॉलनी भागातील दोन घरांत दरोडेखोरांनी धुडगूस घातला. या दरोड्यात 22 तोळे सोने व रोख रक्कम लंपास करण्यात आले. यादरम्यान घरातील लोकांनी विरोध केला असता या दरोडेखोरांनी जबर मारहाण केली. केलेल्या मारहाणीत एका महिलेसह तिघे जखमी झाले असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे.
- अत्याचाराची धमकी देत लुटले घर -
दरोडेखोरांनी पुरुषांसह महिलांनाही लाकडाने मारहाण केली. त्यात एकाचा हात तीन ठिकाणी फ्रॅक्चर झाला. सध्या जखमींवर सोलापूर येथे पोटाची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. चोरटे घरात घुसल्यानंतर घरातील महिला मुलीं सुरुवातीला दागिने देण्यास तयार नव्हत्या. त्यामुळे दरोडेखोरांनी हातातील लाकडाने मारहाण सुरू केली. यानंतरही पैसे व दागिने मिळत नसल्याचे लक्षात आल्यानंतर चार ते पाच जणांपैकी दोघांनी दागिने द्या अन्यथा बरे वाईट केले जाईल अशी धमकी दिली. त्यानंतर महिलांसह मुलींनी दागिने तसेच घरातील पैसे करून दिल्याचे संबंधितांकडून सांगण्यात आले.
कटावणीने कोयंडा तोडून केला आतमध्ये प्रवेश -
याबाबत सविस्तर वृत्त असे की, पोस्टकॉलनी परिसरातील गजानन मंदिराच्या बाजूला जिल्हा रुग्णालयातील स्वच्छता निरीक्षक कन्हैय्या गंगाधर मदनुरकर (५२) वास्तव्यास आहेत. पहाटे तीन वाजेच्या सुमारास दरोडेखोरांनी त्यांच्या दरवाज्याचा कटावणीने आतील कोयंडा तोडून आत प्रवेश केला. सुरुवातीस दरवाजाचा आवाज येत असल्यामुळे मदनुरकर स्वत: झोपेतून जागे झाले. त्यावेळी दोघांनी कोणतीही विचारणा न करता त्यांच्या उजव्या हातावर लाकडाच्या दंडूक्याने वार केले.