महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Omicron in Osmanabad : उस्मानाबाद जिल्ह्यात ओमायक्रॉनचे आणखी 2 रुग्ण आढळले; एकूण रुग्णसंख्या पोहचली पाचवर - उस्मानाबाद ओमिक्रॉन रुग्णसंख्या

जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील मोहा येथे ओमायक्रॉनचे आणखी 2 रुग्ण ( Two Omicron cases in Kalamb ) सापडल्याने धाकधूक वाढली आहे. ओमायक्रॉनच्या 5 रुग्णांपैकी बावी येथील 1 जणाला 11 दिवसांच्या उपचारानंतर जिल्हा शासकीय रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून त्यांची प्रकृती चांगली आहे. मोहा येथील 31 वर्षीय पिता व त्यांच्या 2 वर्षीय मुलाचा ओमायक्रॉन अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर 13 वर्षीय रुग्णाला डिस्चार्ज दिला आहे. मोहा येथील व्यक्ती घाना देशातून आली होती. त्यांना व त्यांच्या 2 वर्षीय मुलाला कोरोनाची लागण झाली आहे.

ओमिक्रॉन
omicron

By

Published : Dec 24, 2021, 3:53 PM IST

उस्मानाबाद :जिल्ह्यात सध्या कोरोना मोठ्या प्रमाणात आपले पाय पसरत आहे. जिल्ह्यात सध्या कोरोनाचे 9 ( Nine Covid Active Patient in Osmanabad )सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी 4 रुग्ण हे ओमायक्रॉन बाधित ( Osmanabad four Omicron cases )आहे. परंतु या ओमायक्रॉन रुग्णामध्ये कोणतीही लक्षणे नाहीत. त्यामुळे जिल्ह्यासाठी दिलासादायक बातमी आहे. मात्र कळंब तालुक्यातील मोहा येथे ओमायक्रॉनचे आणखी 2 रुग्ण ( Two Omicron cases in Kalamb ) सापडल्याने धाकधूक वाढली आहे. गुरूवारी 1 हजार 556 नमुने तपासण्यात आले त्यात 2 नमुने पॉझिटिव्ह आल्याने हे प्रमाण 0.12 टक्के झाले आहे. शहरातील समता नगर येथील 32 वर्षीय पुरुष रुग्ण तर वाशी येथील 43 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे.

हेही वाचा -Omicron 3rd Patient Osmanabad : उस्मानाबाद जिल्ह्यात ओमायक्रॉनचा तिसरा रुग्ण आढळला; 13 वर्षीय मुलीचा अहवाल पॉझिटिव्ह

नागरिकांनी नियमांचे पालन करणे आवश्यक -

जिल्ह्यात आजवर 65 हजार 652 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. त्यामुळे बरे होण्याचे प्रमाण 96.91 टक्के आहे. तर 67 हजार 739 पैकी 1 हजार 507 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. तसेच मृत्यूचे प्रमाण हे 2.22 टक्के इतके आहे. जिल्ह्यात 1507 मृत्यू ( 1507 Deaths in Osmanabad )झाला असून त्यापैकी 360 मृत्यू हे जिल्ह्याबाहेर उपचार घेत असताना झाले आहेत. तसेच 107 जणांचा मृत्यू हा दुर्धर आजार असल्याने झाला आहे. तर पोस्ट कोविडमुळे 108 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे नागरिकांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना व नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.

हेही वाचा -Omicron Patients : उस्मानाबाद जिल्ह्यात ओमायक्रोनचा शिरकाव; पिता-पुत्रांना लागण

ABOUT THE AUTHOR

...view details