उस्मानाबाद : जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 6 हजार 983 पर्यंत जाऊन पोहोचली. तर, यातील 4 हजार 420 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. ही समाधानाची बाब असली तरीही, कोरोना संदर्भातीललोकांच्या मनातील भीती कायम आहे. उमरगा आणि कळंब येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या कोरोना वॉर्डातून दोन पॉझिटिव्ह रुग्ण पळून गेले, त्यामुळे या दोन्ही रुग्णांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कळंब येथील एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आल्याने त्याच्यावरती उपजिल्हा रुग्णालयात कळंब येथे उपचार सुरू होते. उपचारादरम्यान दुपारी हा रुग्ण कोणालाही काही न संगता निघून गेला. त्यामुळे वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वप्निल शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कळंब पोलीस ठाण्यात त्या रुग्णाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.