महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

तुळजापूर मंदिर परिसरातील आंदोलकांचा तंबू हटवला; पोलिसांनी परवानगी नाकारली

अध्यात्मिक आघाडी आणि भाजपातर्फे राज्यातील मंदिरे उघडण्यासाठी तुळजाभवानी मंदिरासमोर आंदोलन सुरू आहे. दिवसभर आंदोलन केल्यानंतर पोलिसांनी रात्री परवानगी नाकारत आंदोलकांनी उभा केलेला तंबू काढून टाकला आहे. त्यामुळे वाद उफाळण्याची शक्यता आहे.

तुळजापूर मंदिर
तुळजापूर मंदिर

By

Published : Nov 6, 2020, 10:42 AM IST

उस्मानाबाद - तुळजापूरमध्ये मंदिर उघडण्यासाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांचा तंबु प्रशासनाने रात्रीच काढून टाकला. तरीही आंदोलकांनी आंदोलन करण्याची ठाम भूमिका घेतली आहे.

तुळजापूर मंदिर परिसरातील आंदोलकांचा तंबू हटवला

अध्यात्मिक आघाडी आणि भाजपातर्फे राज्यातील मंदिरे उघडण्यासाठी तुळजाभवानी मंदिरासमोर आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला परवानगी देण्यात आली नव्हती. मात्र तरीही काल (गुरूवार) हे आंदोलन सुरूच होते. दिवसभर आंदोलन केल्यानंतर पोलिसांनी रात्री परवानगी नाकारत आंदोलकांनी उभा केलेला तंबू काढून टाकला आहे. त्यामुळे या आंदोलनादलम्यान वाद उफाळण्याची शक्यता आहे. राज्यातील मंदिरे खुली करा, यासाठी कालपासून भाजपाच्या अध्यात्मिक समन्वय सेलच्या वतीने तुळजाभवानीच्या मंदिरासमोर धरणे आंदोलन सुरू आहे.

चंडी यज्ञाची तयारी

आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे. सकाळी 8 वाजल्यापासून होम हवन करुन तुळजाभवानीच्या दारासमोर चंडी यज्ञ करण्यात येणार आहे. पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी नाकारली आहे. त्यामुळे आता हे आंदोलन पुढे कसे जाणार, हे पाहणे महत्त्वाचे आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details