उस्मानाबाद -मतदानाची तारीख जशी जवळ येऊ लागली आहे, तशी निवडणुकीच्या प्रचाराची रंगत वाढताना दिसत आहे. राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर मतदारसंघातील निवडणूक ही नेहमीत राज्याच्या केंद्रस्थानी असेत. यावर्षी देखील या मतदारसंघाची चर्चा होताना दिसत आहे. याचे कारण, सहाव्यांदा आमदारकीसाठी रिंगणात उतरलेले काँग्रेसचे उमेदवार मधुकरराव चव्हाण यांना यावेळी त्यांच्याच नावाच्या व्यक्तीसोबत लढावे लागणार आहे.
हेही वाचा... अनोख्या शैलीत शरद पवारांनी घेतला पाटील घराण्याचा समाचार
मधुकर चव्हाण विरुद्ध मधुकर चव्हाण
तुळजापूर मतदारसंघातून पाच वेळा आमदार राहिलेले मधुकरराव चव्हाण हे सहाव्यांदा आपले नशीब आजमावत आहेत. तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेले राणा जगजितसिंह पाटील रिंगणात आहेत. मात्र चव्हाण यांची लढत मात्र अजून एका उमेदवारासोबत असणार आहे. ती म्हणजे 'मधुकरराव चव्हाण'..!