माहिती देताना अध्यक्ष अमरराजे कदम धाराशिव Tuljapur Bandh : तुळजापूरमध्ये साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या तुळजाभवानी मंदिर (Tuljapur Bhavani Mandir) विकास प्रारूप आराखड्यातील दर्शन मंडपाच्या जागेवरून वाद (Controversy Over Tuljabhavani Darshan Mandap) सुरू झाला आहे. दर्शन मंडप मंदिरातच व्हावा, या मागणीसाठी आज तुळजापूर बंद आहे .श्रीतुळजाभवानीच्या नवीन दर्शन मंडपाला तुळजापूर शहरातील पुजारी, व्यापारी आणि स्थानिक नागरिकांकडून विरोध होत आहे.
15 ऑक्टोबरला होणार घटस्थापना : श्रीतुळजाभवानी नवरात्रोत्सव (Tulja Bhavani Navratri Utsav) लवकरच सुरू होणार असून देवीची आता मंचकी निद्रा सुरू आहे. 15 ऑक्टोबरला घटस्थापना होणार आहे. त्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे असं असताना विकास आराखड्यातील काही मुद्द्यावर आक्षेप घेत पुजारी आक्रमक झाल्याचं अमरराजे कदम यांनी सांगितलं.
विकास आराखड्याला दर्शवला विरोध :मंदिर संस्थानचे विश्वस्त आमदार राणाजगजितसिंह पाटील (MLA Rana jagjitsinh patil) यांच्या संकल्पनेतून मंदिर विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. या विकास आराखड्याचं सादरीकरण तुळजभवानी मंदिरासमोर होणार आहे. यात नागरिक, पुजारी आणि व्यापाऱ्यांच्या सूचना मागवण्यात येणार आहेत. असं असताना आज पुजारी मंडळाने या विकास आराखड्याला विरोध दर्शवला आहे.
नवीन दर्शन मंडपाची संकल्पना शासनाकडे सादर :तुळजाभवानीच्या दर्शनाला आलेल्या भाविकांना सुलभ आणि लवकर दर्शन व्हावे, म्हणून आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या संकल्पनेतून नवीन दर्शन मंडपाची संकल्पना शासनाकडे सादर करण्यात आली होती. शासनाने छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत १ हजार ३८५ कोटी मंजूर केले होते. दर्शन मंडप घाटशिळ रोडवरील पार्किंग येथे न करता दर्शन मंडप महाद्वारच्या शेजारील शामल धर्मशाळा, उंबरझरा, विजय वाचनालय, जुने भाजी मार्केट येथे करावे, अशी मागणी शहरातील पुजारी, व्यापारी आणि स्थानिक नागरिकांनी केली आहे.
भाविकांनी केली नाराजी व्यक्त : आज तुळजाभवानीच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांचे कुलाचार पुजारी करणार नाहीत. भाविकांना कुलाचार न करताच केवळ देवी दर्शन घेऊन परतावे लागणार आहे. आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी नवीन दर्शन मंडप संकल्पनेबाबत शहरातील पुजारी, व्यापारी तसंच नागरिक यांना विश्वासात घेतलं नसल्याचं अमरराजे कदम यांनी सांगितलं.
हेही वाचा -
- Tuljabhavani Gold Silver: तुळजापूर मंदिरात दान केलेले सोने-चांदी वितळविण्यास माजी पुजाऱ्याचा जिल्हाधिकाऱ्यांना विरोध, जाणून घ्या कारण
- Tulja Bhavani Temple : अंगावर तोकडे कपडे घालणाऱ्या भाविकांना तुळजापूर मंदिरात दर्शनास मनाई; ड्रेस कोड लागू
- Republic Day : राजपथावर चित्ररथातून साडेतीन शक्तिपीठे, स्त्री शक्तीचा जागर