महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

तुळजाभवानीच्या महंतांसह सहा जणांनी केले लॉकडाऊनचे उल्लंघन; गुन्हा दाखल - complaint against tuljabhawani priest

महंत तुकोजीबुवा यांचा वाढदिवस साजरा करत असतानाचा व्हिडिओ देखील बनवण्यात आला आहे. या प्रकरणाची दखल घेत तुळजापूर पोलिसांनी महंत तुकोजीबुवा यांच्यासह ६ जाणांविरुद्ध भा. दं. वि.च्या कलम १८८, २६९ व कोविड कायदा ११ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

tuljabhawani priest birthday
तुळजाभवानी

By

Published : Apr 12, 2020, 6:08 PM IST

उस्मानाबाद -लॉकडाऊन असताना वाढदिवस साजरा केल्यामुळे तुळजाभवानी देवीचे पुजारी महंत तुकोजीबुवा वाकोजीबुवा यांच्यासह इतर ६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशासनाने नागरिकांना एकत्र येत कार्यक्रम साजारा करण्यास बंदी घातली आहे. मात्र, महंतांनी लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याने पोलिसांनी सदर कारवाई केली.

महंत तुकोजीबुवा यांचा वाढदिवस साजरा करत असतानाचा व्हिडिओ देखील बनवण्यात आला आहे. या प्रकरणाची दखल घेत तुळजापूर पोलिसांनी महंत तुकोजीबुवा यांच्यासह ६ जाणांविरुद्ध भा. दं. वि.च्या कलम १८८, २६९ व कोविड कायदा ११ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सर्वसामान्य नागरिक वेळोवेळी नियम मोडतात, अशी ओरड होत असते, मात्र लोकांना तत्वज्ञान सांगणाऱ्या पुजाऱ्यानेच कायदा मोडल्याने समाजातून नाराजी व्यक्त होत आहे.

हेही वाचा-उस्मानाबादेतील 'त्या' विकलांग बहीण-भावाच्या मदतीसाठी आमदार चौगुलेंचा पुढाकार

ABOUT THE AUTHOR

...view details