उस्मानाबाद- महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या मंचकी निद्रेस प्रारंभ झाला आहे. शुक्रवारी संध्याकाळी देवीला अभिषेक झाल्यानंतर देवीची मूर्ती सिंहासनावरून काढून चांदीच्या पलंगावर मंचकी निद्रा घेण्यासाठी गाभाऱ्यातून बाहेर काढण्यात आली.
या घोर निद्रेस प्रारंभ झाला, ही निद्रा भाद्रपद कृष्ण अष्टमीस सुरुवात होते. परंतु, अधिक अश्विन असल्यामुळे अश्विन कृष्ण अष्टमीस तुळजाभवानीची मंचकी निद्रा करण्यात आली. ही निद्रा शास्त्रानुसार कृष्ण अष्टमी ते अमावस्येपर्यंत असते. नवरात्रामध्ये महिषासूर राक्षसाबरोबर युध्द कसे करावे, याची घोर (चिंता) देवीला लागते म्हणून या निद्रेस घोर निद्रा असे संबोधतात.