महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

तुळजाभवानीची भवानी तलवार अलंकार पूजा

सध्या सर्वत्र नवरात्र उत्सवाची धामधूम पाहायला मिळत आहे. तुळजापुरामध्येही भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. दरवर्षी दसऱ्यापूर्वी भवानी देवीची भवानी तलवार अलंकार पूजा संपन्न होते. यावेळीही मोठ्या उत्साहात ही पूजा संपन्न झाली.

तुळजाभवानीची भवानी तलवार अलंकार पूजा

By

Published : Oct 6, 2019, 10:48 AM IST

उस्मानाबाद - सध्या सर्वत्र नवरात्र उत्सवाची धामधूम पाहायला मिळत आहे. येत्या मंगळवारी दसरा आहे. दसरा झाल्यानंतर येणाऱ्या पौर्णिमेपर्यंत तुळजाभवानी निद्रावस्थेत असते. त्यामुळे पौर्णिमेपर्यंत देवीची अभिषेक पूजा करता येत नाही. मात्र, आजच्या सातव्या माळेदिवशी तुळजाभवानीच्या अभिषेक पूजेनंतर भवानी तलवार अलंकार महापूजा मांडण्यात आली.

तुळजाभवानीची भवानी तलवार अलंकार पूजा

हेही वाचा - नांदेड जिल्ह्यातील विविध मतदारसंघात 'मनधरणी' काउंटडाऊन सुरू

हेही वाचा - मुख्यमंत्र्यांचा नामांकन अर्ज वैध, आशिष देशमुखांची मागणी फेटाळली


छत्रपती शिवाजी महाराज यांना धर्म रक्षणासाठी तुळजाभवानीने प्रसन्न होऊन आपल्या हाताने भवानी तलवार देऊन आशीर्वाद दिला होता. म्हणून या दिवशी देवीजी महाअलंकार घालण्यात येऊन छत्रपतीला भवानी तलवार देत आहे. ही अवतार पूजा मांडण्यात येते. अशा वेगवेगळ्या अलंकाराच्या पूजा तुळजाभवानीच्या केल्या जातात. भवानी तलवार अलंकार पूजेनंतर तुळजाभवानी देवीची महिषासूर मर्दिनी अलंकार महापूजा मांडण्यात येणार आहे. रात्री देवीचा छबिना मिरवणूक काढण्यात आली. यावेळी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. सकाळी 6 वाजता वैदीक होमास व हवनास आरंभ व सकाळी 11 वाजता पुर्णाहुती देण्यात येणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details