उस्मानाबाद- महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या मंदिरात आज चैत्र शुद्ध प्रतिपदा गुढीपाडवा व हिंदु नववर्ष निमित्ताने तुळजाभवानी मंदिरात गुढी उभा करण्यात आली. त्यानंतर तुळजाभवानीची अलंकार पूजा करण्यात आली.
इतिहासात पहिल्यांदाच तुळजाभवानीचा गुढीपाडवा भक्ताविना
कोरोनाला रोखण्यासाठी तुळजाभवानी मंदिर बंद करण्यात आले आहे. त्यामुळे इतिहासात पहिल्यांदाच भक्ताविना तुळजाभवानी मंदिरामध्ये गुढी उभारण्यात आली आहे.
तुळजाभवानीचा गुढीपाडवा
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे मंदिरात मानाचे पुजारी व महंता यांच्या उपस्थितीत गुढी उभा करण्यात आली आहे. कोरोनाला रोखण्यासाठी तुळजाभवानी मंदिर बंद करण्यात आले आहे. त्यामुळे इतिहासात पहिल्यांदाच भक्ताविना तुळजाभवानी मंदिरामध्ये गुढी उभा करण्यात आली आहे. मंदिरावरती गुढी उभा केल्यानंतर तुळजाभवानीची अलंकार पूजा करण्यात आली.