उस्मानाबाद - पंतप्रधानांनी २२ मार्चला जनता कर्फ्यूची हाक दिली होती. त्यानंतर जिल्ह्यात पुन्हा एकदा जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी एक दिवसाचा जनता कर्फ्यू लागू करण्यासाठी काल (सोमवारी) आवाहन केले होते. त्याच अनुषंगाने आज संपूर्ण जिल्ह्यात जनता कर्फ्यू लागू करण्यात आला होता.
उस्मानाबादमध्ये पुन्हा एकदा 'जनता कर्फ्यू' - उस्मानाबाद जनता कर्फ्यू
जिल्हाधिकारी यांनी जनता कर्फ्यू लागू करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आज दिवसभर लोकांनी घरामध्ये बसून जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केलेली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच व्यवसाय ठप्प झाले आहेत. त्याचबरोबर कोरोना विषाणू संसर्गाच्या बाबतीत प्रशासनाकडून विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवल्या जात आहेत. मात्र, लोकांकडून या उपाययोजनाना योग्य तो प्रतिसाद मिळत नाही.
अनेक नागरिक घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी जनता कर्फ्यू लागू करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आज दिवसभर लोकांनी घरामध्ये बसून जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला.