उस्मानाबाद- कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आज आणि उद्या (दि. 21 व 22 मार्च), असे दोन दिवस अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपा मुधोळ- मुंडे यांनी दिले होते. त्याच अनुषंगाने आज संपूर्ण जिल्हा लॉक डाऊन करण्यात आला.
#COVID19 : शनिवार दुपारपासून उस्मानाबादकरांचे 'लॉक डाऊन'ला प्रतिसाद
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सकाळी अकरा वाजल्यानंतर उस्मानाबादकरांनी दुकाने बंद ठेवून लॉक डाऊनला प्रतिसाद दिला.
सकाळच्या सुमारास उस्मानाबदेतील काही दुकाने सुरूच होती. मात्र, अकरा वाजल्यानंतर उस्मानाबादकरांनी दुकाने बंद ठेवून लॉक डाऊनला प्रतिसाद दिला. कोरोनाचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सींगव्दारे सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याशी संवाद साधला. आंतरराष्ट्रीय स्तरावर तसेच देशांतर्गत कोरोनाचा प्रादूर्भाव व प्रसार यात झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे उस्मानाबाद जिल्हा आज आणि उद्या, असे दोन दिवसांसाठी लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा -उस्मानाबादमध्ये कंटेनर-कारचा भीषण अपघात.. चौघांचा मृत्यृ, पाच जखमी