उस्मानाबाद - कळंब शहरात मंगळवारच्या मध्यरात्री तीन चोरीच्या घटना घडल्या आहेत. दोन एटीएम मशीन गॅस कटरच्या साहायाने फोडून अंदाजे 21 लाख रुपये चोरल्याची घटना घडली आहे. तर एका कारखान्यातून गॅस कटर चोरल्याची घटना घडली आहे. एका रात्रीतून दोन एटीएम फोडल्याने शहरात खळबळ उडाली आहे. या सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्या आहेत.
उस्मानाबाद जिल्ह्यात मागच्या काही महिन्यांपासून धाडसी दरोड्यासह चोरीचे प्रमाण मोठ्याप्रमाणात वाढल्या आहेत. मंगळवारी मध्यरात्री अडीच वाजताच्या दरम्यान शहरातील ढोकी रोड परिसरातील बँक ऑफ इंडिया आणि हिताची कंपनीचे दोन एटीएम मशीन चोरट्यानी गॅस कटरच्या साहायाने कापून पैसे घेऊन पसार झाले आहेत. विशेष म्हणजे हा सर्व परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. अशात पोलिसांची गस्त सुरू असताना देखील चोरांनी ही धाडसी चोरी केली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, मंगळवारी रात्री 2 वाजून 28 मिनिटाच्या सुमारास दोन चोरांनी ढोकी नाका परिसरातील हिताची कंपनीच्या एटीएममध्ये सेटर उघडून प्रवेश केला. आत आल्यानंतर त्यांनी सेटर लावून घेतला. त्यानंतर त्यांनी आपल्याकडील असलेल्या गॅस कटरने मशीनच्या पैसे असलेला भाग कापून काढला व त्यातून तब्बल साडे तीन लाख रुपये काढून पसार झाले. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.
एटीएम फोडून लाखो रुपये पळवले