महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

उस्मानाबादेत आढळले आणखी तीन कोरोनाबाधित; एकूण रुग्ण संख्या 4 वर - lockdown

उस्मानाबाद जिल्ह्यात एकूण 58 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी 51 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. 3 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून 4 व्यक्तींचे अहवाल (Inconclusive) प्राप्त झाले आहेत, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

Three more corona- infected found in Osmanabad
उस्मानाबादेत आढळले आणखी तीन कोरोनाबाधित

By

Published : May 15, 2020, 11:45 AM IST

उस्मानाबाद - कळंब तालुक्यातील तिघांचे अहवाल गुरुवारी पॉझिटिव्ह आले असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत एकूण 58 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. या रुग्णालयात त्यापैकी 22 व्यक्तींच्या स्वॅबची तपासणी करण्यात आली. यामध्ये 21 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असून 1 व्यक्तीचा अहवाल कोरोना सदृश(Inconclusive) आला असल्यामुळे त्याची उद्या पुनर्तपासणी करण्यात येणार आहे.

उस्मानाबाद येथील 18 व्यक्तीच्या स्वॅबची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 13 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असून कळंब येथील 3 व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून 2 व्यक्तीचे अहवाल (Inconclusive) आले असल्यामुळे त्यांची पुनर्तपासणी करण्यात येणार आहे. असे जिल्ह्यात एकूण 58 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी 51 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. 3 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून 4 व्यक्तींचे अहवाल (Inconclusive) आले आहेत, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details