उस्मानाबाद- शहरातील साठे नगर भागात राहणारे मच्छिंद्र कारकून काळे यांचा अपघात झाला होता. त्यांच्या अंत्यविधीत लॉकडाऊन मोडून हजर राहिल्या प्रकरणी जवळपास ३०० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उस्मानाबादमध्ये अपघातात एकाचा मृत्यू, अत्यंविधीला उपस्थित तीनशे जणांविरुद्ध गुन्हा - उस्मानाबाद अपघातात एकाचा म्रृत्यू
आंबेडकर विद्यापीठ उपकेंद्राच्या मागच्या रोडवरती निष्काळजीपणाने मोटरसायकल चालवल्याने हा अपघात झाला होता. यात मच्छिंद्र काळे हे गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर गर्दी मच्छिंद्र काळे यांच्या अंत्यविधीसाठी साठे नगर ते स्मशानभूमी पर्यंत लोकांची गर्दी जमली होती.

स्मशानभूमीत जवळपास अडीचशे ते तीनशे लोक असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. त्यामुळे या अंत्यविधीत गर्दी केल्याच्या कारणावरून जिल्हा दंडाधिकारी यांनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आदेशित असलेला नियम आणि अटी मोडल्याप्रकरणी जवळपास तीनशे लोकांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्याचबरोबर याच प्रकरणी मच्छिंद्र काळे यांच्या वरती ही निष्काळजीपणे दुचाकी चालवल्याचा ठपका ठेवत शहरातील आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.