उस्मानाबाद - उमरगा व लोहारा तालुक्यातीस तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह सापडल्याने जिल्ह्यात चिंतेचे वातावरण होते. त्यानंतर या व्यक्तींना आयसोलेट करण्यात आले. आता उपचारानंतर संबंधितांचे अहवाल निगेटिव्ह आले असून जिल्ह्याची कोरोनामुक्तीकडे यशस्वी वाटचाल सुरू आहे. पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नातेवाईकांसह सर्व व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. १४ एप्रिलपूर्वी सर्वांच्या चाचण्या निगेटीव्ह आल्या होत्या. मात्र, आणखी १४ जणांचे अहवाल अद्याप प्राप्त झाले नव्हते.
पुण्यातील टेस्टींग लॅबमध्ये तपासणीसाठी स्वॅब पाठवल्यानंतर दुसऱ्या दिवशी अहवाल प्राप्त होत होते. मात्र १४ पासून १७ एप्रिलपर्यंत पाठवण्यात आलेले सँपल्सचे रिपोर्ट अद्याप प्रतिक्षेत आहेत. काही रिपोर्ट्स सोलापूरला पाठवण्यात आले आहेत.