उस्मानाबाद - तेर येथे होत असलेल्या ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटक पद्मश्री ना. धों. महानोर यांना धमकी देण्यात आली आहे. 'साहित्य संमेलनाला जाऊ नका' असे फोन महानोर यांना अज्ञातांकडून करण्यात आले असल्याचे त्यांनी स्वतः सांगितले आहे.
मा. धों. महानोर यांची प्रतिक्रिया... हेही वाचा... जस्टीस लोया मृत्यू प्रकरणाची फेरचौकशी - गृहमंत्री अनिल देशमुख
वेगवेगळे लोक दररोज फोन करून, साहित्य संमेलनाला न जाण्यासाठी धमकी व दबाव टाकत आहेत. ख्रिस्ती धर्मगुरू फादर फ्रान्सिस दिब्रिटो अध्यक्ष असलेल्या संमेलनाचे तुम्ही उद्घाटक होऊ नका, असे सांगणारे फोन सातत्याने येत आहेत. तरीही आपण उद्घाटक म्हणून संमेलनाला नक्कीच उपस्थित राहणार असल्याचेही महानोर यांनी म्हटले आहे.
हेही वाचा... 'शेतकऱ्यांना कर्जमुक्ती बरोबरच चिंतामुक्तही करणार'
अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनीही फोन करून संमेलनाला जाऊ नका असे महानोर यांना सांगितले होते. मात्र, तरीही मी जाणारच असल्याचे महानोर यांनी म्हटले आहे. ना. धों. महानोर यांनी जरी आपली भूमिका स्पष्ट केली असली, तरीही सध्या ते राहत असलेल्या उस्मानाबाद येथील हॉटेल बाहेर तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे.