उस्मानाबाद -तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा गावातील अनुसुचित जाती व नवबौध्द घटकांचा गेल्या अनेक वर्षांपासून विकास रखडला आहे. यामुळे नवबौध्द घटकातील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. जिल्हा परिषदेने दलित समाजाची स्मशानभुमी अभावी होणारी गैरसोय दुर करण्यासाठी निधी दिला होता. मात्र, ठेकेदाराने अर्धवट काम करुन मुदत संपल्याचे कारण पुढे करत पुढील काम करण्यासाठी टाळाटाळ करत आहेत.
लाखो रुपये मंजूर होऊनही स्मशानभूमी नाही; काक्रंबा गावातील ग्रामस्थ संतापले हेही वाचा - मुंबई-गोवा महामार्गावर कंटेनरची समोरासमोर धडक, एक जखमी
वित्त आयोगातून स्मशानभुमीसाठी विविध कामे करण्यासाठी तब्बल 11 लाख 45 हजार 856 रूपये निधीची मंजुरी देण्यात आली होती. संबंधीत कामाची मागील चार महिन्यांपूर्वीच काक्रंबा ग्रामपंचायतीने ऑनलाईन निविदा प्रक्रिया पूर्ण केली होती. त्यानंतर 3 महिन्यांपूर्वी कामाचा कार्यभारही ठेकेदारास देण्यात आला होता. मात्र, दोन दिवसांमध्ये फक्त 3 लाख 80 हजार रूपयांमधून सिमेंट रस्त्याचे काम पूर्ण काम केले आहे. उर्वरीत साडे सात लाख रूपये खर्चाची कामे करणे बाकी आहेत. संबंधित काम मुदतीमध्ये न संपल्याने ठेकेदारावर ग्रामपंचायत आता कारवाई करणार का? याकडे लक्ष लागले आहे.
हेही वाचा - मद्यपी कारचालकाचा सातारा-पंढरपूर महामार्गावर थरार; 13 जणांना धडक