उस्मानाबाद -शहरातील डॉ. आदिनाथ राजगुरू यांच्या घरातून पंधरा लाख रुपयांची चोरी झाल्याची घटना घडली. या चोरीबाबत आनंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी डॉ.राजगुरू यांच्या घरी काम करणाऱ्या महिलेसह तिच्या एका साथीदाराला अटक केली आहे.
डॉक्टरच्या घरातून 15 लाख रुपयांची चोरी; मोलकरीण गजाआड - पोलीस अधीक्षक राज तिलक रोशन
डॉ. आदिनाथ राजगुरू यांच्या घरी झालेल्या चोरी प्रकरणी पोलिसांनी मोलकरणीला अटक केली आहे. घराच्या कपाटात ठेवलेली रोख रक्कम आरोपी महिलेने वेळोवेळी काढून घेतली. चोरी झालेल्या रक्कमेपैकी 14 लाख 90 हजार रुपयांचे पोलिसांनी जप्त केले आहेत.
घराच्या कपाटात ठेवलेली रोख रक्कम आरोपी महिलेने वेळोवेळी काढून घेतली. डॉ.राजगुरू यांनी ठेवलेल्या पैशात तब्बल पंधरा लाख रुपये कमी असल्याचे आढळून आले. घरात पत्नीला विचारल्यानंतर त्यांनी यातून रक्कम घेतली नसल्याचे सांगितल्यावर राजगुरू यांनी आनंद नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. पोलीस अधीक्षक राज तिलक रोशन यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी मोतीचंद राठोड यांच्या पथकाने तपास करत काही माहिती मिळवली.
डॉ.राजगुरू यांच्या घरी काम करणारी एक महिला दीड महिन्यांपूर्वी अचानक काम सोडून गेली असल्याचे तपासात समोर आले. पोलिसांनी या महिलेचा शोध घेऊन तिला ताब्यात घेतले. कसून चौकशी केली असता तिने चोरी केल्याची कबुली दिली. चोरी झालेल्या रक्कमेपैकी 14 लाख 90 हजार रुपयांचे पोलिसांनी जप्त केले आहेत.