उस्मानाबाद - महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या खजिन्यातील ७१ ऐतिहासिक व पुरातन नाण्यांसह मौल्यवान वस्तू गायब झाल्या आहेत. याची तक्रार पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष किशोर गंगणे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
तुळजाभवानी खजिन्यातील मौल्यवान वस्तू गायब, माजी अध्यक्षांची तक्रार - maharashtra
तुळजाभवानी पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष किशोर गंगणे व अॅड शिरीष कुलकर्णी यांनी माहितीच्या अधिकारात तुळजाभवानी मंदिर संस्थांच्या साठा नोंद दप्तराची मागणी केली होती त्यात ७१ पुरातन नाणी गायब झाल्याचे उघड झाले आहे.
तुळजाभवानी मातेला निझाम, औरंगजेब, पोर्तगीज यांच्यासह बिकानेर उदयपूर लखनो बडोदा आणि इंदोर या घराण्यातील राजे महाराजे यांनी त्यांच्या चलनातील पुरातन नाणी देवी चारणी अर्पण केली होती. या नाण्याची नोंद तुळजाभवानी मंदिर संस्थांच्या रेकॉर्डमध्ये १९८० पर्यंत होती मात्र २००५ व २०१८ मध्ये करण्यात आलेल्या पंचनाम्यात या पुरातन ७१ नाण्यांसह प्राचीन सोन्या चांदीच्या वस्तू आणि मौल्यवान अलंकार दप्तरी नोंदीत नसल्याचे उघड झाले आहे. तुळजाभवानी पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष किशोर गंगणे व अॅड शिरीष कुलकर्णी यांनी माहितीच्या अधिकारात तुळजाभवानी मंदिर संस्थांच्या साठा नोंद दप्तराची मागणी केली होती त्यात ७१ पुरातन नाणी गायब झाल्याचे उघड झाले आहे. देवीला अर्पण केलेल्या या पुरातन नाण्याचा काळाबाजार झाल्याचा संशय व्यक्त करीत चौकशी करण्याची मागणी केली आहे. तुळजाभवानी मातेच्या दानपेटीतील सोने चांदी अपहाराची कारवाई गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असतानाच पुरातन नाणी गायब झाल्याचे उघड झाल्याने खळबळ उडाली आहे