महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

डॉक्टरांनी नाकातून काढले दोन हिरवे वाटाणे - नाकात हिरवा वाटाणा अडकल्याची घटना

जिल्ह्यातील उमरगा शहरात एका लहान मुलाच्या नाकात हिरवा वाटाणा अडकल्याची घटना घडली. शहरातील डॉ. प्रसाद स्वामी यांनी या लहान मुलाच्या नाकात अडकलेले दोन हिरवे वटाणे अलगदपणे बाहेर काढले आहेत.

नाकातून वाटाणा काढताना  डॉक्टर
नाकातून वाटाणा काढताना डॉक्टर

By

Published : Jan 6, 2020, 8:13 AM IST

Updated : Jan 6, 2020, 9:33 AM IST

उस्मानाबाद- जिल्ह्यातील उमरगा शहरात एका लहान मुलांच्या नाकात हिरवा वाटाणा अडकल्याची घटना घडली. शहरातील डॉ. प्रसाद स्वामी यांनी या लहान मुलाच्या नाकात अडकलेले दोन हिरवे वटाणे अलगदपणे बाहेर काढले आहेत.

डॉक्टरांनी नाकातून काढले दोन हिरवे वाटाणे


यामध्ये बालकाला कुठल्याही प्रकारची इजा झाली नाही. दक्ष माणिकवार (वय 4 वर्षे), असे बालकाचे नाव आहे. दक्ष हा तुरोरी या गावचा रहिवासी आहे. या दिवसात हरभरा, वाटाणा, तुरीच्या शेंगा या खाण्यायोग्य होतात. त्यामुळे लहान मुलांसह मोठ्यांनाही ते खाण्याचा मोह आवरत नाही. दक्ष वाटाणा खाताना तो चुकून त्याच्या नाकात गेला आणि अडकला. त्यामुळे दक्ष याला दवाखान्यात न्यावे लागले. डॉ. स्वामी यांनी वाटाणा अलगद बाहेर काढला. मात्र, लहान मुलांनी जेवताना काही खाताना लक्ष देऊन खायला हवे, असे डॉक्टरांनी सांगितले. डॉ. स्वामींच्या कामगिरीमुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

हेही वाचा - उस्मानाबादमध्ये पहिल्यांदाच नव्हे, तर यापूर्वीही झाले होते साहित्य संमेलन

Last Updated : Jan 6, 2020, 9:33 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details