महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अंधश्रद्धेतून अघोरी कृत्य केल्याचा प्रकार; गुन्हा दाखल - अंधश्रद्धा जादुटोणा उस्मानाबाद

नाईचाकूर येथे हैदर महेबूब मुल्ला यांच्या नावे भूकंपतील पूर्नवसित घर आहे. हैदर मुल्ला यांचे निधन झाल्याने दोन खोलीच्या घरात कुणीही राहत नव्हते. या घरात तैसीन पाशामियाँ मुल्ला हिने घरात मोठा खड्डा खोदला असून तेथे कसली तरी पूजा करणार असल्याचे रोजी आतिक महेबूब मुल्ला यांनी पोलीस पाटील बाळू स्वामी यांना सांगितले.

उस्मानाबाद
उस्मानाबाद

By

Published : Nov 4, 2020, 3:22 PM IST

उस्मानाबाद- घरातील व्यक्ती सतत आजारी राहत असल्याने अंधश्रद्धेचे अघोरी कृत्य केल्याचा प्रकार उमरगा तालुक्यातील नाईचाकूर येथील एका घरात उघडकीस आला आहे. खड्डा करून त्यात पूजेचे साहित्य ठेवल्याचा प्रकार उघडकीस आल्याने दोन महिला व एका पुरुषावर गुन्हा नोंद झाला आहे.

नाईचाकूर येथे हैदर महेबूब मुल्ला यांच्या नावे भूकंपतील पूर्नवसित घर आहे. हैदर मुल्ला यांचे निधन झाल्याने दोन खोलीच्या घरात कुणीही राहत नव्हते. या घरात तैसीन पाशामियाँ मुल्ला हिने घरात मोठा खड्डा खोदला असून तेथे कसली तरी पूजा करणार असल्याचे रोजी आतिक महेबूब मुल्ला यांनी पोलीस पाटील बाळू स्वामी यांना सांगितले. स्वामी यांनी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष माधव विठ्ठल पवार, राजेंद्र काशीनाथ डिगुळे, गोविंद पवार व अन्य लोकांना घेऊन त्या घराची पाहणी केली असता एका खोलीत फरशी काढून एक मोठा खड्डा खोदलेला दिसला, त्यामध्ये फुटलेले नारळ, लिंबू असे पूजेचे साहित्य पडलेले निदर्शनास आले. तसेच बाजूस दोन टिकाव, फावडे पडलेले दिसून आले व बाजूच्या खोलीमध्ये तीन किलताणी पोती, दोन लिंबू व नारळ असे साहित्य अघोरी प्रथा व जादुटोणा करून पडलेले दिसले.


गावातील लोकांना दिली गुन्हाची कबुली

सदरील खोलीत चार बाय चार आकाराचा (रुंदी, लांबी व खोली) खडा खांदून हे अघोरी कृत्य करण्यात आले या प्रकरणी गावातील लोकांनी तैसिन पाशामियाँ मुल्ला यांच्याकडे विचारपूस केली असता, त्यांनी सांगितले की, माझी उमरगा येथील बहीण नसरिन शौकत पटेल ही जास्त आजारी पडत असल्यामुळे तिला एका अज्ञात मांत्रिकाने तुम्ही तुमच्या बंद घरात खड्डा खोदून त्यात नारळ, लिंबू पूजा करून टाका, असे सांगितले होते. त्यानुसार मी स्वतः आणि माझी बहिण नसरिन पटेल, बहिणीचा मुलगा अरबाज शौकत पटेल २४ ऑक्टोबरला रात्री बारा वाजता आमचे जुने बंद घरातील खोलीमध्ये खड्डा खोदून त्यामध्ये लिंबू नारळ व पूजा करणार होतो, असे सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details