महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बंदुकीचा धाक दाखवून विवाहितेवर बलात्कार.. पीडितेनंतर पतीनेही केली आत्महत्या

पोलिसाने बंदुकीचा धाक दाखवत वारंवार अत्याचार केल्यामुळे शहरातील बार्शी नाका येथील महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. मात्र आता पीडित महिलेच्या पतीने देखील गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

Suicide of the husband of a woman who committed suicide
Suicide of the husband of a woman who committed suicide

By

Published : Mar 8, 2021, 3:43 PM IST

उस्मानाबाद - पोलिसाने बंदुकीचा धाक दाखवत वारंवार अत्याचार केल्यामुळे शहरातील बार्शी नाका येथील महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. मात्र आता पीडित महिलेच्या पतीने देखील गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. पीडितेच्या आत्महत्येप्रकरणी हरीभाऊ भास्कर कोळेकर या पोलीस कर्मचाऱ्यास अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेच्या पतीने रविवारी (७ मार्च) टाका (ता.औसा जिल्हा लातूर) येथे गळफास घेऊन आत्महत्या केली.

हे ही वाचा - राज्याच्या अर्थसंकल्पातून काय आहेत सामान्य जनेतच्या अपेक्षा, वाचा...

आत्महत्या करण्यापूर्वी पीडितेच्या पतीने देखील एक सुसाईड लिहिली असून, त्यात तिघांची नावे देण्यात आली आहेत. शहरातील बार्शी नाका परिसरात राहणाऱ्या एका 32 वर्षीय विवाहित महिलेने 2 मार्च रोजी सायंकाळी गळफास घेवून आत्महत्या केली होती. सुसाईड नोटमध्ये पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेला पोलीस कर्मचारी हरीभाऊ भास्कर कोळेकर याने बंदुकीचा धाक दाखवून वारंवार बलात्कार केल्याचे नमूद केले होते. यावरुन संबंधित पोलिसाविरुध्द भा.दं.सं. कलम- 376, 306, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता. या पोलीस कर्मचाऱ्यास बलात्कार आणि आत्महत्या प्रकरणी अटक करण्यात आली असून त्यास पोलीस अधीक्षकांनी निलंबित केले आहे. त्यानंतर पीडित महिलेच्या पतीने रविवारी पाच वाजण्याच्या सुमारास औसा तालुक्यातील टाका येथे गुळखेडा रस्त्यावरील जटे यांच्या शेतातील लिंबाच्या झाडास गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली.
हे ही वाचा - महा अर्थसंकल्प २०२१ : व्यापाऱ्यांवर कोणतेही नवे कर लादू नयेत - फत्तेचंद रांका

सुसाईड नोटमध्ये तिघांची नावे

आत्महत्या करण्यापूर्वी पीडितेच्या पतीने एक सुसाईड नोट लिहिली असून त्यात तिघांची नावे आहेत. माझ्या मृत्यूला अमोल सुधाकर निकम, मिथुन सुधाकर निकम, सुधाकर ज्योती निकम हे तिघे जबाबदार असल्याचे या सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details