महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पोलीस तक्रारीची दखल घेत नसल्याने उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न - लहू खंडागळे

उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात आज एका व्यक्तीने अंगावर डिझेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

आत्मदहनाचा प्रयत्न करणारी व्यक्ती आणि पोलीस

By

Published : Jun 13, 2019, 3:03 PM IST

Updated : Jun 13, 2019, 8:09 PM IST

उस्मानाबाद - पोलीस आपल्या तक्रारीची दखल घेत नाही, असा आरोप करत जिल्हाधिकारी कार्यालयात आज एका व्यक्तीने अंगावर डिझेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. लहू खंडागळे असे या आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे.

आत्मदहनाचा प्रयत्न करणारी व्यक्ती आणि पोलीस

खंडागळे यांनी काही दिवसांपूर्वी चारचाकी वाहन खरेदी केले होते. मात्र, त्यांना मारहाण करून महिंद्रा फायनान्सच्या कर्मचाऱ्यांनी हे वाहन चोरून नेले, असा आरोप करत त्यांनी याची रितसर तक्रार आनंद नगर पोलीस ठाण्यात केली होती. पण या तक्रारीची दखल घेऊन कोणीच तपास करत नसल्याने त्यांनी आज दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास अंगावर डिझेल ओतून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पोलिसांनी खंडागळे यांना ताब्यात घेतले आहे.

Last Updated : Jun 13, 2019, 8:09 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details