उस्मानाबाद- पुणे-लातूर मागार्वरील ढोकी येथे चालकाचे नियंत्रण सुटलेला एक भरधाव टिप्पर मुख्य रस्त्याच्या कडेला असलेल्या पत्र्याच्या घरात टिप्पर घुसून पलटी पती-पत्नी जागीच ठार झाले तर तीन जण गंभीर जखमी झाले. ही घटना ढोकी गावात मंगळवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. जखमींना उस्मानाबाद जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
प्रकाश बाबुराव सुरवसे (५५) व मजुरूकाबाई प्रकाश सुरवसे (५०), असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दाम्पत्याची नावे आहेत. तर गणपत प्रकाश सुरवसे यांच्यासह आकाश गणपत सुरवसे व अक्षरा प्रल्हाद सुरवसे ही लहान मुले गंभीर जखमी झाली आहेत.