उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्याची ओळख दुष्काळी जिल्हा म्हणून केली जाते. मात्र, मागील काही दिवसांपासून येथील शेतकरी प्रायोगिक शेतीवर जोर देत आहे. काही महिन्यांपूर्वी येथील शेतकऱ्यांनी सफरचंद पिकवण्याची किमया केली होती. आता येथील शेतकरी मोत्यांची शेती करू पाहत ( farmers pearl farming in Osmanabad ) आहे. यावर कुणाचाच विश्वास बसणार नाही, मात्र हा मराठवाड्यातील पहिलाच प्रयोग असल्याचे ( Marathwadas first pearl farming ) बोलले जात आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापुर तालुक्यातील बारुळ या गावचे तरुण मिळून मोत्यांची शेतीचा प्रयोग करू पाहत आहेत. या गावातील 10 तरुणांनी 2015 साली श्री भवानीशंकर अॅग्रो प्रोडयुसर कंपनीची स्थापन केली होती. शेती अवजारे , दुग्ध व्यवसाय या माध्यमातुन त्यांचे काम चालू होते. शेतकरी हा पारंपरिक शेती करत आहे. त्यांनी शेतीला जोड धंदा केला पाहिजे, या विचाराने त्यांनी मोत्यांचे उत्पादन घेण्याचा निश्चय केला. औरंगाबाद येथील किसान विकास ऍग्रो पर्ल फार्मिंग कंपनीशी करार करून त्यांनी मोत्याचे दोन हजार शिंपले शेततळ्यात सोडले.
शेतकऱ्यांनी धरली मोत्यांच्या शेतीची कास हेही वाचा-Fire in Chemical Factory Kolhapur : इचलकरंजी येथील टेक्स्टाईल पार्कमधील केमिकल फॅक्टरीला आग
2 लाख रुपये गुंतवून वर्षभरात 3 लाख नफा
तरुणांनी शिंपले 85 रुपये दराने घेतले आहेत. औषध खर्चासहित 2 लाखांची गुंतवणूक केली आहे. 12 महिन्यानंतर शिंपल्यातील मोती 365 रुपये दराने किसान विकास ऍग्रो पर्ल फार्मिंग कंपनीला विकणार आहेत. 30 टक्के नुकसान ग्रहित धरून उर्वरित 70 टक्के शिंपल्यातील मोत्याचे उत्पादन 5 लाखांचे उत्पन्न अपेक्षित आहेत. 2 लाख रुपये गुंतवणूक वजा जाता 3 लाखांचा निव्वळ नफा अपेक्षित आहे. तर त्याच शेततळ्यात मत्सपालन करून दुहेरी उत्पन्न घेण्याचा या तरुणांचा मानस ( farmers pearl farming Sucess story ) आहे.
हेही वाचा-Cancelled Trains List : भारतीय रेल्वेच्या 542 गाड्या रद्द; जाणून घ्या कोणकोणत्या गाड्या रद्द
प्रायोगिक शेतीसाठी कृषी विभाग सहकार्य करेन - जिल्हा कृषी अधिकारी
उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांबरोबर आधुनिक पद्धतीने आपल्या शेतात प्रयोग करून उत्पन्न वाढवण्याची गरज आहे. सरकारच्या वेगवेगळ्या योजनांचा लाभ शेतकऱ्यांनी घेतला पाहिजे. कृषी विभागाकडे संपर्क केल्यास शेतकऱ्यांना सहकार्य करुन त्यांचे उत्पन्न वाढीस मदत करू, असे कृषी अधिक्षक जिल्हा कृषी अधिकारी अभिमन्यु काशिद यांनी सांगितले. जिल्ह्यात अल्पवृष्टीमुळे शेतकरी पारंपरिक शेतीवर जास्त भर देतात. मात्र, सरकारच्या अनेक योजना आहेत. त्याचा लाभ घेत प्रायोगिक शेती करून कमी खर्चात जास्तीत जास्त नफा मिळवू शकतात. त्यामुळे या योजनांची माहिती शेतकऱ्यांना होणे गरजेचे आहे. जर शेतकऱ्यांनी अशा सरकारच्या योजनांचे लाभ घेत प्रायोगिक शेतीवर भर दिले, तर नक्कीच शेतकऱ्यांना फायदा होईल, असा विश्वास अधिकारी काशिद यांनी व्यक्त केला.
हेही वाचा-Sharad Pawar Corona Positive : शरद पवार यांना कोरोनाची लागण; पवारांनी केली विनंती