महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

उस्मानाबादेत सुरू असलेल्या पावसामुळे मुगापाठोपाठ सोयाबीनला उगवले कोंब - Osmanabad Farmer latest news

उस्मानाबादेत मुगापाठोपाठ सोयाबीनचे पीकही संकटात सापडले आहे. उस्मानाबाद तालुक्यातील टाकळी बेंबळी शिवारातील सोयबीन शेतात उभे असतानाच शेंगातून कोंब उगवले आहेत. तर, काही ठिकाणी जागेवरच शेंगा कुजत आहेत. सातत्याने होत असलेल्या पावसामुळे हे होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. दुबार पेरणी, बियाण्याबाबत फसवणूक यातून कसाबसा बाहेर पडलेला शेतकरी नवीन संकटात सापडला आहे.

उस्मानाबादेत शेतकरी संकटात
उस्मानाबादेत शेतकरी संकटात

By

Published : Sep 23, 2020, 7:58 PM IST

उस्मानाबाद - जिल्ह्यात गेली काही दिवसापासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. बहुतांश धरणात पाणीसाठा जमा झाला आहे. मात्र, शेतकऱ्यां समोर नवीन संकट उभे राहिले आहे. मुगापाठोपाठ आता सोयाबीनचे पीकही संकटात सापडले आहे. उस्मानाबाद तालुक्यातील टाकळी बेंबळी शिवारातील सोयबीन शेतात उभे असतानाच शेंगातून कोंब उगवले आहेत. तर, काही ठिकाणी जागेवरच शेंगा कुजत आहेत.

उस्मानाबादेत सुरू असलेल्या पावसामुळे मुगापाठोपाठ सोयाबीनला उगवले कोंब

हेही वाचा -उस्मानाबादमध्ये संततधार पावसामुळे जेमतेम पाणीसाठा उपलब्ध

सातत्याने होत असलेल्या पावसामुळे हे होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. सुरुवातीला बियाणे न उगवल्याने शेतकऱ्यांनी कशीबशी दुबार पेरणी केली होती. त्यातच बोगस बियाणे विक्रेत्यांनी देखील शेतकऱ्यांनी फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला होता. या संकटांवर मात करत शेतकरी उबा रहात असताना हे नवीन संकट आता उभे राहिले आहे. परिसरातील शेतकरी चिंताग्रस्त असून हाता-तोंडाशी आलेला घास हिरावून जात असल्याने याबाबत लवकरात लवकर पाहणी करून पंचनामे करण्याची मागणी करीत आहेत.

हेही वाचा -'या' कारणासाठी स्वतः च्या अन् मुलीच्या तोंडाला काळे फासून नगरपंचायतीसमोर आंदोलन

ABOUT THE AUTHOR

...view details