महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

उस्मानाबादेत फक्त १२ टक्के क्षेत्रावरच पेरणी; उत्पादन घटणार - पेरणी

यंदा खरिप हंगाम संपत चाललेला आहे आणि उस्मानाबादेत फक्त १२.३५ टक्के क्षेत्रावर पेरण्या झालेल्या आहेत. त्यामुळे यंदा पिकांचे उत्पादन घटणार आहे.

पेरणी

By

Published : Jul 3, 2019, 11:13 PM IST

उस्मानाबाद- जिल्ह्यात अत्यल्प पाऊस झाला आहे. मात्र, शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पेरणीच्या प्रमाणात घट झाल्याचे चित्र आहे.

पेरणीबद्दल बोलताना शेतकरी

जिल्ह्यात एकूण ४ लाख १३ हजार ६८ हेक्टर खरीपाचे क्षेत्र आहे. गेल्यावर्षी जुलै महिन्यात यापैकी ५३ टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या होत्या. मात्र, यंदा ८०.०६ मिमी पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्या करू नये, असे आवाहन करण्यात आले होते. मात्र, शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली. एकूण क्षेत्रापैकी ५० हजार ९९४ हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झालेल्या आहे. यामध्ये सोयाबीनची सर्वाधिक पेरणी झाली आहे. त्याचबरोबर प्रामुख्याने तूर, उडीद, मूग पिकांचे उत्पन्न घेतले जाते. मात्र, यंदा खरिप हंगाम संपत चाललेला आहे आणि फक्त १२.३५ टक्के क्षेत्रावर पेरण्या झालेल्या आहेत. त्यामुळे यंदा पिकांचे उत्पादन घटणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details