उस्मानाबाद - पळसप या गावातील एका 18 वर्षीय मुलाने आपल्या बापाच्या डोक्यात काठी मारून हत्या केल्याची घटना घडली आहे. पळसप येथील दगडप्पा लाकाळ यांच्या कुटुंबात किरकोळ कारणावरून वारंवार भांडणे होत होती. दगडप्पा लाकाळ यांना दारूचं व्यसन होतं. दारूच्या नशेत ते अनेकदा पत्नीला मारहाण करायचे.
दारूच्या नशेत आईशी भांडणाऱ्या बापाची हत्या; मुला विरुद्ध गुन्हा दाखल - मुलाकडून दारूड्या बापाचा खून
पळसप या गावातील एका 18 वर्षीय मुलाने आपल्या बापाच्या डोक्यात काठी मारून हत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी मृताची पत्नी अनिता लाकाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ढोकी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
मंगळवारी(दि.19 नोव्हें)ला रात्री दगडप्पा व त्यांच्या पत्नीत जोरदार भांडण झाले. यावेळी दगडप्पा यांनी पत्नीला मारहाण केली. संबंधित प्रकारासंर्भात विचारणा करत असताना मुलगा बालाजी व त्याच्या वडिलांमध्ये शाब्दिक भांडण झाले. याचे रुपांतर हाणामारीत झाले; आणि मुलाने काठीने दारूच्या नशेत असलेल्या वडिलांना मारहाण केली. या मारहाणीत दगडप्पा यांना गभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे.
या प्रकरणी मृताची पत्नी अनिता लाकाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ढोकी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.