महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

उस्मानाबादमध्ये नवे सहा रुग्ण; दोघे अत्यवस्थ - osmanabad corona update

जिल्ह्यात आज आणखी सहा कोरोनाबाधितांची भर पडली असून एकूण आकडा १३ वर गेला आहे. आज शहरात एक रुग्ण आढळल्याने जिल्ह्याची वाटचाल रेड झोन कडे सुरू झालीय.

osmanabad corona news
जिल्ह्यात आज आणखी सहा कोरोनाबाधितांची भर पडली असून एकूण आकडा १३ वर गेला आहे.

By

Published : May 20, 2020, 4:02 PM IST

उस्मानाबाद - जिल्ह्यात आज आणखी सहा कोरोनाबाधितांची भर पडली असून एकूण आकडा १३ वर गेला आहे. आज शहरात एक रुग्ण आढळल्याने जिल्ह्याची वाटचाल रेड झोन कडे सुरू झालीय. मागील अनेक दिवसांपासून जिल्हा ग्रीन झोन मध्ये होता.

मात्र जिल्ह्यातील अन्य भागात रुग्ण सापडत असल्याने शहरातव देखील रुग्णांची टांगती तलवार होती. यापूर्वी जिल्ह्यात सात बाधइत रुग्ण होते. काल रात्री (19 मे) उशिरा आलेल्या अहवालात सहा जण पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले.

मुंबई तसेच पुण्यातून आलेल्या सहा रुग्णांना कोरोनाची लागण झाली असून त्यापैकी दोघे गंभीर आहेत. यातील एक महिला रुग्ण गरोदर असल्याची माहिती मिळत आहे. प्रशासनाने नवे रुग्ण सापडताच त्यांच्या संपर्कात आलेल्या 46 जणांना क्वारंटाईन केले आहे. संबंदितांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहेत.

नव्याने आढळलेले रुग्ण

परांडा तालुक्यातील खंडेश्वरवाडीचे 2 जण, भूम तालुक्यातील गिरवली येथील 13 वर्षाचा एक मुलगा , उस्मानाबाद शहरातील एक तरुण, लोहारा तालुक्यातील जेवळीचा एक तरुण, तर तुळजापूरच्या एका महिलेचा यामध्ये समावेश आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details