महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

उस्मानाबाद जिल्ह्यात आढळले पोलिओसदृश बालक, खबरदारीसाठी लसीकरण सुरू - जिल्हा परिषद आरोग्य विभाग

उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर येथे चार वर्षाचे पोलिओसदृश बालक आढळून आले आहे. त्यामुळे खबरदारीचा भाग म्हणून जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून गावांमध्ये लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यात आढळले पोलिओसदृश बालक

By

Published : Aug 22, 2019, 9:58 PM IST

उस्मानाबाद -जिल्ह्यातील तेर येथे चार वर्षाचे पोलिओसदृश बालक आढळून आले आहे. त्यामुळे खबरदारीचा भाग म्हणून जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून गावांमध्ये लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. या माध्यमातून सातशे पेक्षा जास्त बालकांचे लसीकरण करण्यात आले.

उस्मानाबाद जिल्ह्यात आढळले पोलिओसदृश बालक
तेर येथील एक चार वर्षीय बालकामध्ये पोलिओसदृश आजाराची लक्षणे आढळली. याबद्दल संशयित पोलिओ रुग्ण म्हणून ३१ जुलैला ग्रामीण रुग्णालयाने जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना अहवाल सादर केला आहे. तसेच या बालकाच्या विष्ठेचा नमुना तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित बालकाला पोलिओ आहे की नाही, हे अहवाल आल्यानंतर स्पष्ट होईल. खबरदारीचा भाग म्हणून आरोग्य विभागाच्यावतीने गावात विशेष लसीकरण मोहीम राबवण्यात आली. मोहिमेतून ७३८ बालकांना लस दिली गेली.

ABOUT THE AUTHOR

...view details